सलमान खानदेखील लावणार ‘नच बलिये’मध्ये ठुमके ?

छोट्या पडद्यावरचे सर्वच भाषांमधील रिऍलटी शो सध्या चर्चेत आहेत. त्यातच आता बिग बॉस 13 नंतर एक डान्स रिऍलिटी शो मागच्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आला आहे. नच बलिये सीझन 9 हा शो त्याच्या आगळ्या वेगळ्या थीममुळे यंदा खूप चर्चेत आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोची ऑफिशियल लिस्ट समोर आहे. या शोच्या स्पर्धकांचे प्रोमो व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर आता या स्टार प्लसने नवा प्रोमो व्हिडिओ रिलीज केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वजण गोंधळलेले आहेत.

स्टार प्लसच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एका बाजूला शोचे स्पर्धक आणि इतर मालिकांमधील कलाकार दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सलमान खानची झलक दिसत आहे. यावरून या शोमध्ये सलमान सुद्धा त्याच्या बलिये सोबत या शोमध्ये सहभागी होणार असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे आता सलमानसोबत या शोमध्ये कोण सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. नच बलियेचा हा नववा सीझन यावेळी सलमान खान प्रोड्यूस करत आहे. त्यामुळे यावेळी शोची थीम पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी नच बलियेच्या डान्स फ्लोअरवर कपल्स सोबत एक्‍स कपल्स सुद्धा दिसणार आहेत. हा शो मनिष पॉल होस्ट करणार आहे. तर परिक्षक म्हणून रविना टंडन, अली अब्बास जफर आणि आणखी एक प्रसिद्ध कोरिओग्राफर काम पाहणार आहेत. मात्र या कोरिओग्राफरचं नाव अद्याप समजलेलं नाही. याशिवाय आणखी एक अभिनेता असेल जो या शोला जज करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.