श्रीक्षेत्र तुळापूर शंभूभक्‍तांसाठी सज्ज

धर्मवीर संभाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोरेगाव भीमा- श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे धर्मवीर संभाजीराजांच्या 330 वी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असून सभा मंडप, स्वागत कमानी, भगवे झेंडे, पिण्याच पाणी, वाहन तळ अशी सर्व तयारी झाली असून तुळापूर नगरी शंभूभक्‍तांसाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत यांनी दिली.

श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 330 व्या पुण्यतिथी बलिदान दिन पाळतण्यात येत असून यानिमित्त पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्‍त विद्यमाने पुण्यस्मरण दिनासह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 5) सकाळी 8 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी 8 वाजता श्री संगमेश्‍वराला अभिषेक व श्री छत्रपती शंभुराजांची पूजा मान्यवराच्या हस्ते होईल.

छत्रपती संभाजी राजाची न निघालेली अंतयात्रा म्हणून मुख पदयात्रा निघेल या मध्ये हजारो तरुण सहभागी होतील. त्यानंतर साखळदंडाचे पूजन करण्यात येईल. यानंतर रोहिदास महाराज हांडे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, गितांजली झेंडे, शंतनू धावडे यांचे व्याख्यान होईल. तसेच मैदानी खेळाचे साहसी प्रात्यक्षिक होणार आहे. व्यसनमुक्ती महासंघाच्या वतीने शक्‍ती शौर्य यात्रा पेडगाव ते तुळापूर ही काष्टी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, टाकळी भीमा, धानोरे , कोरेगाव भीमा अशी मजल दरमजल करत तुळापूर नगरीत दाखल होईल यावेळी बंडातात्या कराडकर मार्गदर्शन करतील. पुरंदर ते तुळापूर अशी धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा संदिप भोंडवे यांच्या नेतृत्व खाली येईल. ग्रामपंचायत तुळापूरच्या वतीने रंगरगोटी डागडुजी लगीन घाई सुरू असुन सभा मंडप, पिण्याचे पाणी, वाहनतळाची उत्तम व्यवस्था केली जात आहे, तसेच येणाऱ्या शंभु भक्‍तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, सरपंच गणेश पुजारी, अमोल शिवले, राहुल राऊत, माजी सरपंच रूपेश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, पेरणेचे उपसरपंच रविंद्र वाळके, संजय शिवले आदींनी दिली

  • पोलीस दल यंदा प्रथमच देणार शासकीय मानवंदना
    छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुमहाराजांना साथ देणाऱ्या 12 मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते तसेच स्वराज्य रक्षक संभाजी रक्षक मालिकांतील सर्व कलाकार भेट देणार आहे, त्यांचा सन्मान तसेच या मालिकेतील पोवाडा गायक शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी एक वाजता सर्व शंभुभक्तांच्या उपस्थितीत प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र होइल. यानंतर सामुदायिक मानवंदना तसेच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होईल. तसेच यावर्षी प्रथमच पोलिस दलाच्या वतीने प्रथमच शासकीय सलामी देण्यात देणार आहे. त्यानंतर कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. राज्यातील नामवंत पैलवानाच्या 50 प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहे. हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.