‘पीएम मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या दिवशीच

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखा, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली.  मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली असून येत्या ५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला ‘पीएम  मोदी’ हा चित्रपट ५ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. आगामी लोकसभा निवडणुक आचार संहिता लागू करण्यात आल्याने या निवडणुका पारदर्शकरित्या पार पडण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकेत केली होती. याची दखल घेऊन न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश देताना प्रतिवादींना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.