शिख समाजाची हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्यावर जर्मनीत गुन्हा

बर्लीन (जर्मनी) : शिख आणि काश्‍मिरी समुदायाची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून एका भारतीय दाम्पत्यावर जर्मनीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात त्यांना 10 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते.

या दाम्पत्यावर मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जर्मन गोपनियता कायद्यामुळे त्यांची पूर्ण नावे जाहीर करण्यात आली नाहीत. मनमोहन एस. (वय 50) आणि त्यांची पत्नी कंवलजित (वय51) अशी त्यांची नावे सांगण्यात आली. फ्रॅंकफर्ट येथील न्यायलयात त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे.

मनमोहन एस. यांनी जर्मनीतील काश्‍मिरी आणि पंजाबी समुदायाची आणि त्यांच्या कुटुंबियांची माहिती भारतीय परदेशी गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्याला दिल्याची कबुली दिली आहे. जुलै ते डिसेंबर 2017 या काळात या दाम्पत्याची भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत मासिक बैठक होत असे. त्याबद्दल त्यांना सात हजार 200 युरो (आठ हजार 100 अमेरिकन डॉलर्स) मानधन मिळाल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

जर्मनीत शिखांची संख्या जवळपास 10 ते 20 हजाराच्या दरम्यान आहे. युरोपात ब्रिटन आणि इटली पाठोपाठ सर्वात जास्त शिख जर्मनीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.