कल्याण डोबिवलीत महापौरपद भाजपाला देण्यास सेनेचा नकार

मुंबई : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती तुटल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पद देण्यास शिवसेनेने नकार देत आणखी एक धक्का दिला. या युतीच्या ताब्यात मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण डोंबिवली अशा चार महापालिका आहेत.

शिवसेनेने कल्याण डोंबिवली माहापालिकेत महापौरपदाची चार वर्ष पूर्ण केल्यावर अखेरच्या वर्षी भारतीय जनता पक्षाला शेवटच्या वर्षी महापैरपद द्यायचे असे ठरले होते. त्याची मुदत या नोव्हेंबरमध्ये संपत होती. त्याला शिवसेने स्पष्ट शब्दात नकार दिला.

ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के बिनविरोध महापौर झाले. त्यानंतर तेथे शिवसेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यांनी त्यांची ठाण्यातील ताकद यावेळी दाखवून दिली. यावेळी बोलतान एकनाथ शिंदे म्हणाले, महापौर आणि उपमहापोै यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी आभार मानतो. पक्ष नेत्यांचे आणि विशेषत: जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानतो. येथे आल्याबद्दल आदित्य आणि उध्दव ठाकरे यांचे मी आभार मानतो. सत्तेपेक्षा शहराचा विकास अधिक महत्वाचा आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्याबात तीनही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. त्यावर काम करत आहेत. ही चर्चा योग्य दिशेने होत आहे. त्याचा निर्णय योग्य वेळी होईलच. जर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला सर्वाधिक आनंद होईल. अर्थात त्याचा अंतिम निर्णय स्वत: उध्दवजीच घेतील. आमदारांची शुक्रवारी बैठक होणार आहे. त्यात उध्दव ठाकरे त्यांचा निर्णय आम्हाला सांगतील, असे शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.