विश्रांतीनगरमधील ड्रेनेज, रस्त्याचे काम सुरू 

नगरसेवकांच्या हस्ते कामांचे भूमीपूजन

पुणे :  सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांतीनगर ( प्रभाग 34 ) मधील ड्रेनेज  तसेच सिमेंट रस्त्याच्या कामास रविवारी सुरूवात करण्यात आली. या कामांचे भूमीपूजन नगरसेविका ज्योती गोसावी आणि नगरसेवक ऍड. प्रसन्न जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

या दोन्ही नगरसेवकांच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित विकास निधीतून विश्रांतीनगर गल्ली 1 नं 4 ते अक्षय अपार्टमेंट ए बी सी सुदामी अपार्टमेंट,पश्‍चिमा रेसिंडेंसी,ए बी सी,सिल्वर क्रिस्ट स्कुल परिसरात ड्रेनेज  लाईन तसेच रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे. नगरसेवक श्रीकांत जगताप नगरसेविका मंजुषा नागपूरे, आरती राहुल गोसावी केतन गोसावी यांच्यासह अभिजीत कदम,राजाभाऊ कदम,,धनंजय पाटील,संतोष चौरे, मंगेश बुजवे बाळु आखाडे यांच्यासह या परिसरातील नागरिक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.