वाघोलीत “ग्रामपंचायत आपल्या दारी’ला प्रतिसाद

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप सातव यांनी वार्ड क्रमांक सहामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने विविध योजना तसेच नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याकरिता “ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला. वाघोलीसारख्या लोकसंख्येने जास्त असणारे गावांमध्ये समस्यांची यादी देखील मोठी आहे. या समस्या सोडवण्यासाठी बऱ्याचवेळा नागरिकांना ग्रामपंचायतीकडून सहकार्य मिळते. मात्र, अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करताना साध्या अडचणी निर्माण होतात. याकरिता ग्रामपंचायत सदस्य संदीप सातव यांनी हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमांतर्गत त्यांनी ग्रामपंचायतीच्या कर भरणाकरिता नागरिकांना आवाहन करून वार्ड क्रमांक सहामधील जास्तीत जास्त नागरिकांच्या कर भरणा करून घेतला आहे. रस्त्यांच्या अडचणीबाबत तातडीने दुरुस्ती करून घेतली आहे. भोगवटा प्रमाणपत्र तारीख आणि फ्लॅटधारकाने सदनिका ताब्यात घेतलेली तारीख यामधील टॅक्‍स कोणी भरायचा, हा एक विषय सातव हे सोडवित आहेत. नागरिकांवरील कराचा भार कमी करण्यासाठी बांधकाम व्यवसायिक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढत आहेत. सांडपाणी, अंतर्गत रस्ते, तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आणि प्रश्‍नांची सोडवणूक सातव यांनी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे वारंवार चकरा मारण्याची पद्धत सध्या वाघोलीमध्ये वार्ड क्रमांक सहामध्ये कमी होऊ लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.