राजस्थान: ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीनुसार महिला उपलब्ध करून देणाऱ्या सेक्स रॅकेटचा जोधपूर पोलिसांनी खुलासा केला आहे.
एका भारतीय आणि रशियन मुलींना दोन दलालांसह अटक करण्यात आली. शहराच्या वायुसेना क्षेत्रातील ‘सूर्यगढ गेस्ट हाउस’वर पोलिसांनी छापा टाकून या सर्वांना अटक केली. हा संपूर्ण व्यवसाय ऑनलाइन वेबसाइटद्वारे चालत होता. जयपूर मुख्यालयातून हा व्यवसाय चालविला जात होता.
पोलिसांना माहिती मिळाली की शहरात ऑनलाइन वेबसाइटवरून बुकिंग केल्यानंतर एक परकीय महिला देह व्यवसायासाठी जोधपूर येथे आली आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास पोलिसांनी वायुसेना परिसरात ‘सूर्यराज गेस्ट हाऊस’ वर छापा टाकला. आणि येथून दोन महिलांना दलालांसह अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या दोन मुलींपैकी एक रशियन मुलगी आहे.