वागदरवाडीच्या ग्रामसभेत सत्ताधारी-विरोधकात खडाजंगी

वाड्या-वस्त्यांना होणार पाणी पुरवठा

वाल्हे- वागदरवाडी (ता. पुरंदर) येथे या वर्षी प्रथमच टंचाई योजनेतून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांसाठी वीस लाख 55 हजार रूपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. ही योजना वाल्हे-वागदरवाडीच्या जुन्या पाइपलाइनला जोडण्यासाठी आयोजित ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधी गटामध्ये जोरदार खडाजंगी उडाली.

वागदरवाडी येथे नुकत्याच सुरू झालेल्या टंचाई योजनेतील जवळपास वीस लाख 55 हजार रूपयांच्या पाइपलाइनच्या कामात दिरंगाई होत आहे. त्या अनुशंगाने येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये सरपंच उषा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीमा बंटी भुजबळ, भास्कर भुजबळ, दत्तात्रय पवार, संगिता पवार, पोपट पवार, राजसिंह पवार, महेंद्र पवार, सुनील पवार, शांताराम पवार, ग्रामसेवक मनोज ढेरे, धनंजय पवार, बंटी भुजबळ, अजित शिंदे, सुनील कदम व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी वाल्हे गावावरुन वागदरवाडीला केलेल्या पाइपलाइनमुळे अगोदरच गावाला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातच या पाइपलाइनला आणची चार वाड्या-वस्त्यांचा भार दिल्यास गावाला कमी पुरवठा होणार नसल्याचे कारण पुढे करीत वादगरवाडीकरांनी या योजनेला एकमुखी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, महेंद्र पवार यांनी सांगितले की, टंचाई योजनेतून आलेल्या निधीतून वाल्हे परिसरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर बांधण्यात येणार आहे. यासाठी जागा शोधण्यात येणार आहे. विहिरीतून वाल्हे ते वागदरवाडी येथील जुन्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेपर्यंत पाइपलाइन करुन वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामसभेने मंजूर केला आहे.

  • या योजनेबाबत ग्रामपंचातीचे कोणतेही पत्र नसून माजी सभापती अतुल म्हस्के यांच्या मागणीनुसार सदरची योजना राबविली आहे. सदरची योजना पूर्ण झाल्याखेरीज निधी देण्याचा प्रश्नच येत नाही.
    बी. एन. सानप, उपअभियंता पंचायत समितीचे पाणीपुरठा
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)