भैरवनाथ विद्यालयास सीसीटिव्ही कॅमेरे भेट

मांडवगण फराटा – शिरूर तालुक्‍यातील आलेगाव पागा येथील श्री. भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके होते. विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग गगनभरारी घेतली आहे. याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे, असे बेनके यांनी सांगितले. 2007-08 मधील दहावीच्या बॅचने एक लाख रुपये किमतीचे सीसीटिव्ही कॅमेरे भेट दिले. अनिल रासकर यांनी देणगीतून बोअरवेल घेऊन शाळेत पाण्याची सोय केली आहे. सारिका वाघचौरे, प्रवीण बेनके, योगेश खेडकर, मनीषा गायकवाड यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके, अतुल खेडकर, मारूती शिंदे, भानुदास शिंगाडे, सागर आसवले, नवनाथ वाघचौरे, दत्तात्रय वाघचौरे, बाळासाहेब जाधव, आजी- माजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.