पालिकेच्या आरोग्य सेवेने चिनी प्रवाशी भारावला

पुणे :  प्रत्येक वर्षी कोटयावधी रूपये खर्चून महापालिकेकडून शहरातील तब्बल 40  लाखांहून अधिक पुणेकरांना आरोग्य सेवा पुरविली जाते. त्यानंतरही या आरोग्य सेवेला नेहमीच टिकेचे धनी व्हावे लागते. मात्र, महापालिकेच्या आरोग्य सेवेचे कौतुक चक्क एका चिनी नागरिकाने केले आहे. महापालिकेच्या नायडू रूग्णालयात चार दिवस उपचार घेणारा हा प्रवासी या आरोग्य सेवेने भारावला असून त्यांनी रूग्णालयातून बाहेर पडताना महापालिकेचे तोंडभरून कौतुक केले आहे. या प्रवाशाला पाच दिवसांपूर्वी विमानात उलटी झाल्याने करोना विषाणूचा संसर्ग झाला म्हणून डॉ. नायडू रूग्णालयात उपचारासठी दाखल करण्यात आले होते.
चीन मधील गॅन्गडोन मधून भारतात पर्यटनासाठी हा 31 वर्षीय युवक आला होता. मुंबईहून पुण्यात विमानाने येताना या प्रवाशा उलटी झाली. त्यामुळे सहप्रवाशांनी हा चिनी नागरिकाला करोना व्हारयस झाला असून विमानातून उतरविण्याची मागणी केली होती. त्यानंतर तत्काळ पुण्यात या प्रवाशाला उतरवून पालिकेच्या डॉ. नायडू रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.होते. हा प्रवासी 7 फेब्रुवारी पासून नायडू रूग्णालयात दाखल होता. तसेच त्याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते. करोनाच्या संशयित रूग्णांना 14 दिवसांसाठी नियंत्रणाखाली ठेवण्यात येते. या युवकाला भारतात येऊन 10 दिवस झाले होते. त्यामुळे उपचाराचा भाग म्हणून त्याची करोना तपासणी निगेटीव्ह आल्यानंतरही तो स्वत: चार दिवस पुण्यात थांबला होता. त्यानंतर परत जाताना, या प्रवाशाने आपला अभिप्राय नोंदविला असून पालिकेच्या आरोग्य सेवेचे मनभरून कौयुक केले आहे. तसेच हा एका चिनी नागरिकाला आलेला सुखद अनुभव असल्याचे त्यांने आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे.

या व्यक्त केल्या भावना
मी इथ पर्यंत हे सगळ अचानक घडलं. त्यामुळे इथे असणाऱ्या सुविधा आणि भाषेच्या समस्येची अडचण या मुळे मी भेदरलेला होतो. मात्र, चिन मध्ये उद्भवलेल्या स्थिती नंतर प्रत्येक जण मदतीसाठी उभा होता. या ठिकाणी असलेली आरोग्य सुविधा अतिशय चांगली आहे. प्रमुख्याने जेवन, स्वच्छता, उपचार तसेच मला स्वतंत्र ठेवण्यात आलेला कक्षही चांगला आहे. त्यामुळे इथले डॉक्‍टर, स्टाफ, नर्स यांचा मी मनापासून आभारी आहे.
——————-

Leave A Reply

Your email address will not be published.