दोन गावठी पिस्तूल व चार काडतूसांसह दोघे सराईत जेरबंद

पुणे,दि.8- समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना दोन गावठी पिस्तूल व चार जीवंत काडतूसांसह जेरबंद केले आहे. हे दोघेही पिस्तूल व काडतूसे विकण्यासाठी सोमवार पेठेतील दारुवाला पूल येथे आले होते.
रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण(रा.सोमवार पेठ) आणी मुनाफ रियाज पठाण(रा.डोके तालीम ,नाना पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. समर्थ पोलिसांनी मिळालेल्या खबरीनूसार त्यांना दारूवाला पुलापाशी सापळा रचून अटक केली. त्यांच्या अंगझडतीत दुध्याकडे एक पिस्तूल व दोन जीवंत काडतूसे तर मुनाफ यांच्याकडेही एक गावठी पिस्तूल आणी दोन काडतूसे असा 1 लाख 800 रुपयांचा शस्त्रसाठा मिळाला. त्यांच्यावर आर्म ऍक्‍टनूसार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मंगेश शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, नितीन अतकरे, पोलीस कर्मचारी सुशिल लोणकर, संतोष काळे, निलेश साबळे, अनिल शिंदे, अजय शितोळे, बाळासाहेब भांगले, सचिन पवार, शाम सुर्यवंशी, स्वप्निल वाघोले यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.