दीर्घ प्रतीक्षेनंतर जुन्नरच्या पूवर भागात पावसाचे पुनरागमन

अणे – आठ-दहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली. राजुरी, बेल्हे, निमगावसावा, साकोरी, आणे, गुळंचवाडी, गुंजाळवाडी, जाधववाडी या परिसरांमध्ये पावसाने शुक्रवार (दि. 19) सायंकाळी चांगली हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वीज आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी नुकत्याच केलेल्या खरीप पिकांना या पावसाने चांगलाच आधार मिळणार आहे. पेरणीनंतर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिलं होतं; परंतु या पावसाने पिकाला तात्पुरता दिलासा मिळणार आहे. अणे पठार भागावर बाजरी, कांदा, तूर, कडधान्य, मूग, उडीद या पिकांना पावसांनी दिलासा मिळणार असल्याची माहिती अणे गावचे माजी सरपंच किशोर आहेर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.