जुन्नर नगरपरिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

जुन्नर-स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पश्‍चिम विभागात केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जुन्नर नगर परिषदेला महारष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवमनिषा म्हैसवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुंबई येथे झालेल्या गौरव समारंभात नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, नगरसेवक समिर भगत, दिपेश परदेशी, आरोग्य प्रमुख प्रशांत खत्री यांनी हा सन्मान स्विकारला. जुन्नर नगरपरिषदेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018-19 मध्ये विविध उपक्रम राबविले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.