जुन्नर तालुक्‍यात 33 केंद्रांना पाठ्यपुस्तकाचे वितरण

जुन्नर- जुन्नर तालुक्‍यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप एकूण 33 केंद्रांना करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळवे आणि नवीन पुस्तके मिळण्याचा आनंद विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी हे नियोजन करण्यात आले असल्यो जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी केले.

जुन्नर तालुक्‍यासाठी मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत पहिली ते आठवीचे मराठी व उर्दू माध्यमाचे सर्व विषयांचे एकूण पुस्तके 2 लाख 4 हजार 494 प्रती बालभारती, पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये पहिली – मराठी माध्यम – प्रती विषय 4084, तर उर्दू माध्यम – 95, दुसरी – मराठी माध्यम – प्रती विषय – 4085, तर उर्दू माध्यम प्रती विषय – 95, तिसरी – मराठी माध्यम प्रती विषय – 4084, तर उर्दू प्रती विषय – 95, चौथी मराठी माध्यम प्रती विषय 4448, तर उर्दू माध्यम प्रती विषय 112, पाचवी मराठी माध्यम प्रती विषय – 4477, तर उर्दू प्रती विषय – 119, सहावी – 4726 प्रती विषय , तर उर्दू प्रती विषय 121, सातवी मराठी माध्यम प्रती विषय – 5047, तर उर्दू माध्यम प्रती विषय – 126, आठवी – मराठी माध्यम प्रती विषय – 5207, तर उर्दू माध्यम प्रती विषय 119.
2017-18 च्या “यू-डायस’मध्ये शाळेने नोंदविलेल्या विद्यार्थी संख्येप्रमाणे बालभारती, पुणे यांच्याकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली होती .त्यानुसार प्रत्येक केंद्राच्या आकडेवारीनुसार पाठ्यपुस्तके वाटप केले आहे. केंद्र स्तरावरून प्रत्येक शाळानिहाय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे काटेकोर नियोजन केले आहे. या पाठ्यपुस्तके वाटपकामी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शिंदे, तर विषयतज्ज्ञ गुंजाळ, तोरणे, श्रीमती थोरात यांनी आणि समग्र शिक्षा अभियान कर्मचारी काम आणि संचलन केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.