नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 नोव्हेंबरपर्यत वाढ करण्यात आली. त्यांना व्हिगडिओ कॉन्फरसींगच्या माध्यमांतून न्यायालयात हजर करण्यात आले.
आयएनएक्स मिडिया प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायलयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचनालयाने ताब्यात घेतले होते. त्यांच्या न्यायलयीन कोठडीची मुदत बुधवारी संपत होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.