कोंढापुरीची पाणीपुरवठा योजना पावसाळ्यातही बंद

  • कुंभारखाणी तलाव कोरडा ः पाणी सोडण्यासाठी आमदार, तहसीदारांना निवेदन

शिक्रापूर  – कोंढापुरी (ता. शिरूर) या गावाला दोन ते तीन महिने दुष्काळाशी सामना करताना कोंढापुरी गावामध्ये कधीही न आठवणारा पाण्याचा दुष्काळ यावर्षी मोठ्या प्रमाणात जाणवला आहे. दोन महिने पाण्याचे टॅंकर चालू आहेत. सध्या धरण क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानादेखील आज कोंढापुरी गावची पाणीपुरवठा योजना बंद आहे.
कोंढापुरीच्या या तलावात केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित भूमिकेमुळेच पाणीसोडले जात नाही. कोंढापुरी येथील पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा योजना कुंभारखाणी तलावाशेजारी असून त्यामुळे पाणीटंचाई उद्‌भवत आहे. या कुंभारखाणी तलावात अजिबात पाणी उपलब्ध नसल्याने नळ पाणीपुरवठा योजना बंद झाल्याने पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतला शक्‍य होत नाही. या तलावात वितरिका क्रमांक 13मधून त्वरित पाणी सोडल्यास गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने सुटेल. तरी पिण्यासाठी गावच्या कुंभारखाणी तलावात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी शिरुरचे तहसीलदार गुरु बिराजदार व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.