केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 141 जवान कोरोनापासून बचावले

मुंबई : नवी मुंबईतील तळावर वास्तव्यास असणाऱ्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या 11 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान उरलेल्या 141 जवानांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र त्या सर्वांचेअहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे.

कोरोनाग्रस्त 5 जवान मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 6 जणांवर कोविड 19 उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार करण्यात येणार आहेत. या जवानांना घरात विलगीकरणात राहण्याचेआद्रश देण्यातआले आहेत. त्यापैकी 120 जण कळंबोली येथील सीआयएसएफच्या संकुलात राहणअर आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागातर्फे देखरेख ठेवली जाणार आहेत. तर अन्य 21 जण पनवेल पालिकेच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये राहतील.

पनवेलमध्ये सध्या कोरोनाचे 15 रुग्ण आहेत. यापैकी एक रुग्ण बरा झाला असून त्याची कोविड 19 टेस्टदेखील निगेटिव्ह आली आहे. शहरातील जिल्हा कोविड 19 रुग्णालयात 10 जण दाखल करण्यात आले आहेत.या नागरिकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

जवानांमध्ये चार जणांची चाचचणी गुरूवारी पॉझिटिव्ह आली होती. तर शुक्रवारी आखणी सहा जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका जवानामध्ये काही दिवसांपुर्वी याची लक्षणे आढळली होती. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आणखी चार जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. तर शुक्रवारी आणखी सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.

दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलातील एका डॉक्‍टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला हरीयाणातील झज्जर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा डॉक्‍टर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या कार्यालयात कार्यरत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.