आणे-पेमदरा पठार भागासाठी 15 टन चारा वाटप

निवृत्तीनगर – महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच यंदा दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत. कडाक्‍याच्या उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी शेतकरी अटोकाट प्रयत्न करीत आहेत, हे पाहता महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कृषक संस्थेमधील शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त पूर्वभागात 15 टन हिरवा चारा पाठविण्यात आला. या आवारात या चारा गाड्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, उपसभापती उदय भोपे, रामदास बोऱ्हाडे, गजानन हाडवळे, विष्णू थोरवे, ऍड. अविनाश थोरवे, प्रदीप थोरवे, सचिन हाडवळे, शेतकी अधिकारी गोरखनाथ उकिर्डे, सरपंच मीना उकिर्डे, उपसरंपच नितीन थोरवे, पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके, पेमदऱ्याचे सरपंच रंगनाथ बेलकर, माजी सरपंच आनंद बेलकर, विकास शिंदे, उपसरपंच देवराम भोसले, वैभव आहेर, पोलीस पाटील अमोल थोरवे, विक्रम मोरे, बाळासाहेब नायकोडी, पांडुरंग नायकोडी, डॉ. दौलत नायकोडी, संतोष सोमोशी, सुभाष डोके, आनंद ओैटी, विकास शेळके, राजेंद्र शेळके, सरपंच सचिन विधाटे, संस्थेचे सभासद, मुख्य हिशोबनीस काचळे साहेब, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावातील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सभासद आनंद औटी यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी दहा हजार रू. धनादेश सत्यशिल शेरकर यांच्याकडे सुपुर्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.