आंदोलन तीव्र करण्यासाठी भाजपकडून “ऑफर’ : दळवी

आरक्षणासह मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तीन वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या “मराठा क्रांती’ मोर्चात राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने काही हस्तक पेरले होते. त्यांच्यामार्फत त्यावेळी आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न होता. यावेळी नेमकी उलटी भूमिका घेऊन राज्यात मोठे आंदोलन उभे करण्याचा व ते हायजॅक करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू झाल्याची गंभीर भूमिका मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष दळवी यांनी नगरमधील या बैठकीत मांडली. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी “मराठा क्रांती’चे नियोजित आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षांच्या मदतीशिवायच व्हायला हवे. भाजपसह अन्य कोणत्याच राजकीय पक्षाचा व नेत्यांचा पक्ष म्हणून आंदोलनात सहभाग नको. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी राज्यभर विविध संघटनांच्या बैठका सुरू आहेत. या आंदोलनास सर्वच नेत्यांनी केवळ व्यक्ती व समाज म्हणून पाठबळ द्यावे किंवा सहभागी व्हावे. कोणत्याच राजकीय पक्षाकडून या आंदोलनाचा राजकारणासाठी हस्तक्षेप होणार नाहीत, याबाबत सर्वांनीच दक्षता घ्यायला हवी, अशी परखड भूमिका मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष दळवी यांनी बैठकीत मांडली.

 दळवी यांच्या मताशी अनेकांनी सहमती दर्शविली. कोणत्याच पक्षाला या नियोजित आंदोलनाचा राजकीय फायदा उठविता येणार नाही, यावर एकमत झाले. 

Leave A Reply

Your email address will not be published.