अण्यात आज शेतकरी आंदोलन

अणे- अणे (ता. जुन्नर) येथे मंगळवार (दि. 28) अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका यांच्या वतीने जनावरांसह नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. अणे बस स्थानक परिसरात सकाळी साडेनऊच्या दरम्यान हे आंदोलन होणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत.

यामध्ये प्रमुख पठार भागावर चारा डेपो त्वरित मंजूर करावा, मुख्यमंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे पशुखाद्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे, दुष्काळाने होरपळलेल्या व गारपीटग्रस्त फळबागांचे पंचनामे ताबडतोब करावेत, शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळावी, पीक विमा ताबडतोब मिळावा, पाझर तलाव-नाले-बंधारे यामधील गाळ काढणे, खोलीकरण करणे, गळती रोखणे इत्यादी कामे त्या त्या विभागामार्फत त्वरित सुरू करावेत, दुष्काळी परिस्थितीतील रोजगार बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, विद्यालयीन व महाविद्यीान विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ व्हावी, अशा विविध मागण्या या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आंदोलनाचे नियोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुक्‍याचे उपाध्यक्ष भास्कर बन्सीलाल आहेर, अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी करणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)