उद्या लागणार बारावीचा निकाल

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकाल मंगळवारी (दि. 28 मे) रोजी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर होईल. त्यानंतर दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येतील. बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शंकुतला काळे यांनी आज बारावी निकालाचा आढावा घेतला. त्यात निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होत आहे. आता विद्यार्थ्यांची निकालासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहेत. तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ते पाहता येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी राज्यभरातून एकूण 14 लाख 91 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार

maharashtraeducation.com

http://mahresult.nic.in/

http://mahahsscboard.maharashtra.gov.in./

Leave A Reply

Your email address will not be published.