#HBD Zareen Khan : सिनेसृष्टीत पदार्पणापूर्वी झरीनचे होते 100 किलो वजन…

साल 2009 ला प्रदर्शित झालेल्या ‘वीर’ या सिनेमाद्वारे बाॅलीवूडमध्ये कतरिना कैफसारखी हुबेहुब दिसणा-या एका तरुणीने एन्ट्री घेतली होती. लोकांनी जेव्हा या तरुणीला सिल्व्हर स्क्रिनवर पाहिले तेव्हा ती कतरिनाच नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला होता. कतरिनासारखी दिसणा-या या तरुणीचे नाव आहे झरीन खान. 14 मे 1987 रोजी मुंबईत जन्मलेली झरीन आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनेता सलमना खानने झरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. ‘वीर’ हा तिचा हा तिचा पहिला चित्रपट होय. ‘वीर’मध्ये सलमानने झरीनला बॉलिवूडचे तिकिट दिले. खरं तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही, मात्र झरीनच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचे नामांकनसुद्धा मिळाले.

झरीन हिने ‘रेडी’, ‘हाऊसफुल-२’, ‘हेट स्टोरी’ यासारख्या सिनेमात काम केलंय. 2015 मध्ये झरीनचा हेट स्टोरी 3 हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. झरीन हिने आपल्या बोल्ड अभिनयाव्दारे चाहत्यांची मने जिंकली होती. हा सिनेमा बाॅक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर 2017 मध्ये अक्सर 2 आणि 2018 मध्ये 1921 हा तिचा सिनेमा प्रदर्शित झाला. विक्रम भटच्या “1921’मध्ये ती करण कुंद्राबरोबर दिसली होती. मात्र त्या सिनेमाला बॉक्‍स ऑफिसवर विशेष यश मिळाले नव्हते.  हिंदी भाषेशिवाय तिनं तामिळ आणि पंजाबी सिनेमात देखील काम केलं आहे.

सिनेसृष्टीत पदार्पणापूर्वी झरीनचे होते 100 किलो वजन…

झरीनची ओळख तिचा आकर्षक लूक आहे. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी झरीनचे वजन तब्बल 100 किलो होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात जंकफूड खात असल्याने तिचे वजन 100 किलो झाले होते. मात्र सलमानच्या सल्ल्यावरुन तिने आपले वजन कमी केले. त्यानंतर सिनेमात येण्यापूर्वी तिने जवळजवळ 40 किलो वजन कमी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)