वाहन आणि गृहकर्जावरील व्याजदरात कपात होणार
नवी दिल्ली -अलाहाबाद बॅंकेने सोमवारी आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केली आहे. बॅंकेने आपला एमसीएलआर कमी केला आहे. एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 8.65 टक्क्यावरून 8.60 टक्के करण्यात आला आहे.
बहुतांश गृहकर्जाचे व्याजदर एक वर्षासाठीच्या एनसीएलआरशी जोडलेले असतात. एक, तीन व सहा महिन्यासाठीचा एमसीएला आता 8.20 टक्के ,8.40 टक्के आणि 8.45 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 14 मे पासून करण्यात येणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेने या अगोदरच्या दोन पतधोरणात आपला मुख्य व्याजदर म्हणजे रेपो दरात पाव टक्क्यांनी कमी केलेला आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंक जूनमधील पतधोरणातही व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.