योगी-मोदींच आमच्यासाठी सुप्रीम कोर्ट आहेत – संजय राऊत 

लखनऊ – शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राम मंदिराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यंदा राम मंदिर निर्मितीस कोणीही रोखू शकत नाही. आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जनताच सर्वोच्च न्यायालय आहे. आम्ही सगळे मिळून राम मंदिराची निर्मिती करू. ही श्रेयवादाची लढाई नसून जनतेचं निर्णय आहेत. आणि भगवान श्रीरामासाठी कोणता कायदा? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, योगीजींची सर्वात जास्त आस्था राम मंदिरावर आहे. आम्ही योगी आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर बनवणार आहोत. न्यायालयाचा मी मान ठेवत असून कायदा त्याच्या जागेवर आहे. परंतु, आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामच्या घोषणेवरून झालेल्या वादावर संजय राऊत म्हणाले, मी ममता बॅनर्जींना आवाहन करतो कि त्यांनी जय श्रीरामाचा नारा द्यावा. परंतु, ममता यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे भाजपचे १८ खासदार निवडून आले, असेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)