सुमित वाळुंज व सिद्धेश पडवळ विजेते

File photo

पुणे – सुमित वाळुंज व सिद्धेश पडवळ यांनी सिद्धार्थ मोहोळ स्मृती वेट लिफ्टिंग स्पर्धेतील चौदा वर्षा खालील मुलांच्या गटात प्रथम स्थान घेतले. ही स्पर्धा जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना आणि नामदेव रावमोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान यांनी आयोजित केली होती.

टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळ येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्‌घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्रीय मंडळचे कार्यवाह धनंजय दामले, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संग्राम मोहोळ तसेच महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रमोद चोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धाचा बक्षीस सभारंभ मीरा मोहोळ यांच्या हस्ते पार पडला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – मुले 14 वर्षांखालील-32किलो – लव भुसारी (शिवदुर्ग ), 36 किलो -स्वरूप कारले (सुमंत जिम), 40 किलो -प्रतीक गोसावी (सुमंत जिम), 44किलो -राज गाडे (काळे अकादमी). 49 किलो -सुमित वाळुंज (सुमंत जिम), अमोल अजबे (एच. आर. एम),अथर्व सुपेकर (काळे अकादमी). 53 किलो -सिद्धेश पडवळ (सुमंत जिम), ओंकार कुंभारे (स्क्वाड जिम), अल्ताफ सय्यद (डायमंड जिम)
58 किलो – साहिल आढाव (सोमण जिम), रोहन महाडिक (पीसीएमसी).आयुश कदम (स्क्वाड जिम). 58 किलोवर-यश ठाकूर (सुमंत जिम)

14 वर्षांखालील मुली –

32 किलो -वैष्णवी रिठे (सुमंत जिम),45किलो-श्रीविद्या चकोर (सुमंत जि ), श्रेया चितळे (दुबे जिम),मानसी सुकाळे (सुमंत जिम). 50 किलो -समीक्षा वाळुंज (सुमंत जिम), मयुरी होले (सुमंत जिम). 55किलो -मनश्री निकाळजे (पीसीएमसी), स्नेहल भोडवे ((सुमंत जिम), पायल वाळुंज (सुमंत जिम) 55 किलोवर-संस्कृती ठाकूर (काळे अकादमी), साक्षी सुतार (सुमंत जिम).

12 वर्षाखालील मुले-28 किलो-

वेदांत रिठे (सुमंत जिम), ऋग्वेद महाजन (पीसीएमसी), 32 किलो -साई वाळुंज (सुमंत जिम), रोहन भोंडवे (सुमंत जिम),लव भुसारी (शिवदुर्ग)

36 किलो -आदित्य बेंद्रे (पीसीएमसी), आर्यन कदम (पीसीएमसी), आयुष मुरूमकर (दुबेज). 40 किलो-आर्यन महाजन (पीसीएमसी)
49 किलो -प्रतीक निकाळजे (पीसीएमसी).49 किलोवर-प्रसन्न कड (सुमंत जिम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)