छप्रा – बिहार मध्ये सरण जिल्ह्यात तीन जणांची जमावाकडून हत्या करण्याचा प्रकार आज सकाळी घडला. हे तिघे जनावर चोरणारे असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी त्यांना ठार मारले. पैगंबरपुर गावात हा प्रकार घडला. राजू नात, बिडेश नात आणि नौशाद कुरेशी अशी जमावाच्या मारहाणीत ठार झालेल्यांची नावे आहेत.
विशेष म्हणजे हे तिघेही जण याच गावचे रहिवासी होंते. पहाटेच्या सुमाराला ते संशयास्पदरित्या फिरत असल्याच आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना घेरून बेदम मारहाण केली. त्यावेळी दोन जण जागीच ठार झाले तर तिसरा रूग्णालयात नेला जात असताना मरण पावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.