माउंट एव्हरेस्टची उंची नेपाळ सरकार पुन्हा मोजणार

काठमांडू – जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर हिमालयातील माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. त्यासाठी चार गिर्यारोहकांचा समावेश असलेले पथक बुधवारी एव्हरेस्टवर रवाना होत आहे. एव्हरेस्ट शिखर नेपाळ आणि चीन यांच्या सीमेवर असून त्याची उंची 8848 मीटर म्हणजे 29029 फुट आहे.
भारतीय पथकाने 1954 साली या शिखराची उंची नोंदविली होती. त्यानंतरही अनेकदा या शिखराची उंची मोजली गेली मात्र आजही 1954 साली मोजलेली उंचीच जगात प्रमाण मानली जाते.

नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या प्रलयंकारी भुकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा आहे. त्यावर पूर्णविराम द्यावा यासाठी नेपाळ सरकारने 2017 साली एव्हरेस्ट पर्वतारोहण अभियानाची घोषणा करून सर्व्हेक्षण दल पाठविण्यास मंजुरी दिली होती. भूकंप झाल्यापासून एव्हरेस्टच्या उंचीबाबत सतत शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने चार जणांची टीम नियुक्त केली होती. या सर्वाना दोन वर्षे शिखर उंची मोजण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले गेले आहे तसेच टॉपवर विपरीत हवामानात हे काम असे करायचे, त्यासाठी नेलेली अत्याधुनिक उपकरणे कशी वापरायची याचेही प्रशिक्षण दिले गेले आहे. ते ग्राउंड लेव्हलपासूनच नोंदी घेणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here