वादळी वाऱ्याचा तडाखा

संगमनेर तालुक्‍यात रविवारी (दि. 9) रोजी झालेल्या अवकाळी पावसात अंगावर वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला. तसेच 7 घरांचे अंशत: नुकसान झाले. तर नगर तालुक्‍यात रविवार व सोमवार रोजी वाळकी येथील घोडके यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. तसेच शाळेच्या दोन खोल्यांचे पत्र देखिल उडून गेले असल्याचे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे. तर सोमवारी (दि.10) रोजी दुपारी बुऱ्हाणनगर, नारायणडोहो, चिचोंडी पाटील येथील घराचे पत्रे उडून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नगर शहारामध्ये एका रिक्षावर हायमॅक्‍सचा पोल पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

राहुरी तालुक्‍यात रविवार(दि.9) रोजी राहुरी (बु.) येथे 5 घरांचे नुकसान झाले आहे. तर बारागाव नांदुर येथे 2 घरांचे नुकसान झाले आहेत. तर पारनेर तालुक्‍यात जवळे, राळेगण थेरपाळ व पिंपळनेर येथे फळपिकांचे 55 हेक्‍टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्‍यात धामणगाव फाटा येथे विज पडून एक बैल दगावला. शरणखेल नवलेवाडी, आगस्ती नगर, उंचखडक, मनोहरपुर, रुभोडी, कुंभेफळ, रेडे, सुगाव बु, टाकळी, खानापुर, गर्दणी याठिकाणी 5 ते 10 घरांची पडझड झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)