श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : इसिसने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर आता इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.

श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये २९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ५०० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत. त्यानंतर आता दोन दिवसांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने त्यांच्या अमाक या वाहिनीद्वारे या बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली आहे.

बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सोशल माध्यमे देखील काही काळ बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर श्रीलंकेत काल मध्यरात्री पासून आणीबाणी लागू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)