#लोकसभा2019 : पुण्यातील मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे- देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणूकी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून 31 उमेदवार रिंगणात आहेत.

पुण्यात मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील अनेक कलाकारही आज घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावत आहेत. आज काही कलाकारांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बदल घडवण्याचं आवाहन करत सोशल मीडियावर आपले व्हिडीओ आणि फोटो अपलोड करताना दिसतायेत.

पुण्यातील मतदानकेंद्रावर आज तुला पाहते रे फेम मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता सुबोध भावे यांने बुधवार पेठ येथील नुतन समर्थ मतदान केंद्र येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, लेखक व गायक सलील कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सुयश टिळक, मुग्धा गोडसे, अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अमेय वाघ, सोनाली कुलकर्णी , आर्या आंबेकर, लेखिका आश्लेषा महाजन यांनीही पुण्यातून मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेता सुबोध भावे

https://twitter.com/subodhbhave/status/1120551921495040001

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेता अमेय वाघ

अभिनेता सुयश टिळक

https://www.instagram.com/p/BwlN8c2hxhm/?utm_source=ig_web_copy_link

बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे

https://www.instagram.com/p/BwlQVMWBb_K/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता अमोल पालेकर 

सारेगम’फेम आर्या आंबेकर

अभिनेत्री गायत्री दातार

लेखक व गायक सलील कुलकर्णी आणि अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.