दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला मदतीची तयारी

सेऊल – दक्षिण कोरियाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी आणि शेजारी देश उत्तर कोरियाला 8 दशलक्ष डॉलरची तात्डीची मदत देण्यचे मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून उत्तर कोरियाल ही आर्थिक मदत द्यायची तयारी दक्षिण कोरियाने दर्शवली आहे. उत्तर कोरियामध्ये भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून उत्तर कोरियाला अन्नधान्याची मदत करायची तयारीही दक्षिण कोरियाने दर्शवली आहे.

दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण विभागाच्या मंत्रालयाने उत्तर कोरियाला मदत करण्याबाबतच्या कार्यक्रम निश्‍चितीसाठी आपली चर्चेची तयारी असल्याचे म्हटले आहे. जगतिक अन्न कार्यक्रम आणि संयुक्‍त राष्ट्राच्या बालकांसाठीच्या निधीच्या सहकार्याने या मदत कार्यक्रमाची निश्‍चिती केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला ही मदत दिली गेल्यावर उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान आण्विक मुद्दयांवर सुरू असलेल्या चर्चेची प्रक्रिया पुन्हा व्यवस्थित सुरू होईल, अशी आशाही दक्षिण कोरियाने व्यक्‍त केली आहे. मात्र दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला मदतीसाठी अद्याप कोणताही निश्‍चित कार्यक्रम तयार केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)