तवकल वस्ताद यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण करुन वृक्षरोपण 

जुना मंगळवार बाजार चौकाला वस्ताद यांचे नांव देण्याची मागणी

नगर: शहरात स्वातंत्र्यपुर्व व नंतरच्या काळात धार्मिक व सामाजिक एकतेसाठी योगदान देणारे जुन्या पिढीतील नामवंत मल्ल तवकल वस्ताद यांचा 64 वा पुण्यस्मरण दिन तवकल वस्ताद यंग पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला. टिळक रोड जवळील तवकल वस्ताद मळा येथील शहाश्‍वर गाझी कब्रस्तान येथे त्यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण करुन वृक्षरोपण करण्यात आले. तवकल वस्ताद यांच्या इतिहासाने नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी जुना मंगलवार बाजार चौकाला तवकल वस्ताद यांचे नांव देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक दत्ता कावरे, हाजी मो.जुबेर वस्ताद, मो.मुस्ताक वस्ताद, वीजूभाऊ परदेशी, ऍड.शिवाजी डमाळे, माजी सैनिक रफिक शेख, मतीन सय्यद, अरबाज चौधरी, तौफिक शेख, शफी खुदाबक्ष खलिफा, सोफियान कांबळे, दिलावर बागवान, वसिम वस्ताद, नासिर वस्ताद, अर्शद शेख, रोहन परदेशी, दिपक वर्मा, इम्रान शेख, भोला पैलवान, मुख्तार पैलवान, वसिम पैलवान, अदनान बागवान, अंबादास सोनवणे, बाबा प्लंबर राजे, रेहान जुबेर वस्ताद, अय्युब बाबूभाई पैलवान, पै.सुभाष लोंढे, पै.अफजल शेख, पै.बब्बा सोनवणे, अली पैलवान, अल्ताफ शेख, जुबेर शेख, आसिम शेख, अब्बास अली वस्ताद, अनिस वस्ताद, अब्दुल कादिर, वसिम शेख आदिंसह तवकल वस्ताद यांचे वंशज, शहरातील पैलवान घराण्याचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविकात मो.मुस्ताक वस्ताद म्हणाले की, तवकल वस्ताद यांनी शहरात जातीय सलोख्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे विचार व इतिहास जीवंत ठेवण्यासाठी स्मृतीदिन साजरा करुन त्यांच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यात आला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी पवित्र रमजान महिन्याच्या 13 व्या रोजी दि.17 मे 1954 ला त्यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले.

वीजूभाऊ परदेशी म्हणाले की, तवकल वस्ताद यांनी शहरात धार्मिक व सामाजिक सलोखा राखला. सर्व धर्मिय शिष्यांना त्यांनी मल्ल विद्येचे प्रशिक्षण देऊन आपल्या मुलांप्रमाणे वागणुक दिली. सर्वधर्म समभाव जोपासणारी त्यांची रजवडी तालिमचा मोठा इतिहास आहे. पैलवानकी करीत असताना त्यांनी खरी माणुसकी जपली. आजच्या मल्लांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक दत्ता कावरे यांनी तवकल वस्तादांचा गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळण्याची गरज आहे.

राजाश्रय असलेल्या या मल्लाने सर्व धर्मिय पैलवान घडवले. जुना मंगलवार बाजारला तवकल वस्ताद यांचे नांव देण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. ऍड.शिवाजी डमाळे यांनी तवकल वस्ताद यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे बारावे वंशज असलेले इंदूरचे महाराज श्री शिवाजीराव होळकर राजवाड्यात केलेल्या कुस्त्या, सुलतानभाई यांच्या ऐतिहासिक तालिमीचे नुतनीकरण करुन सर्वधर्मिय मल्लांसाठी खुली केलेली तालिम, 1946 साली शांतता कमिटीची स्थापना आदि विविध ऐतिहासिक घटनांना त्यांनी उजाळा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.