शहरात “प्रीपेड रिक्षा’ धावण्याची चिन्हे

पोलीस, आरटीओ आणि रिक्षा संघटनांची बैठक
पुणे  – शहरामध्ये “प्रीपेड रिक्षा’ चालविण्याच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार असून शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा धावणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.  गेल्या काही महिन्यांपासून स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि संगमवाडी या ठिकाणांहून ही सेवा सुरू होणार असल्याची चर्चा होती. याबाबत वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर चाचणीदेखील घेतली होती. ही सेवा वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणाखाली चालविण्यात येणार असल्याने, नुकतीच वाहतूक पोलीस आणि शहरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्या बैठक पार पडली.

यावेळी झालेल्या चर्चेत रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शेअर रिक्षा चालविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. यांसह रिक्षासंबंधित समस्या सोडविण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या समितीच्या माध्यमातून या प्रकल्पांतर्गत मार्ग ठरविणे, भाडे ठरविणे, कायदेशीर बाबींची तपासणी करणे आदी गोष्टींवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यासह शहरातील 40 हून अधिक रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)