तुळजापुर- महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी देऊळ कवायत कलम 36 कायद्यानुसार श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात नियम मोडणाऱ्यावर कार्यवाही करावी. तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने योग्य त्या मुलभुत सुखसुविधा भाविकांना मिळत नसल्यामुळे श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने दि.28 मंगळवार रोजी श्री तुळजा भवानी मंदीर प्रशासनाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री तुळजा भवानी मंदीर प्रशासनचे व्यवस्थापक दिनेश झापंले यांना श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात एक लेखी निवेदन देण्यात आले.
श्री तुळजा भवानी मंदीरातील सर्व कायदेशीर हक्कदार पुजा-यांना सन्मानाची वागणुक मिळाली. श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरातील दर्शन मंडपात कोणतेही गैर प्रकार करणाऱ्या व्यक्तीस मंदीरात प्रवेश देवु नये. यासह विविध सर्व मागण्या संदर्भात तत्काळ अंमलबजावनी करण्यात यावी अन्यथा या पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.