सासू-सासऱ्यापासून पतीला वेगळे करणे क्रूरताच… (भाग-१)

लग्न झाल्यावर पत्नीने पतीच्या कुटुंबासमवेत राहणे अपेक्षित असून आजारी आईपासून पतीला वेगळे करणे, स्वत:च्या मुलाला मारून स्वत:देखील आत्महत्या करण्याची दिलेली धमकी, सासरच्या लोकांविरुद्ध दिलेली खोटी तक्रार, या सर्व बाबी मानसिक क्रूरतेच्या व्याख्येत बसतात अशा बाबी जर पत्नीकडून केल्या गेल्या तर पती घटस्फोटास पात्र ठरतो, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाने एका अपिलात स्पष्ट केले आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांचा संदर्भ देत घटस्फोटासाठीच्या क्रूरतेची व्याख्या न्या. सुधांशु धुलीया व न्या. आर. सी. खुलबे यांच्या खंडपीठाने आणखी स्पष्ट केली आहे.

शिनू महेंद्रू विरुद्ध संगीता ऊर्फ सोनिया या खटल्यात उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या नैनिताल खंडपीठाने 10 मे 2019 रोजी हा महत्त्वपूर्ण व क्रूरतेचे विश्‍लेषण करणारा निकाल दिला आहे. कुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा जो अर्ज फेटाळला तो निकाल रद्द करीत पत्नीने क्रूरता केल्याचे निष्पन्न करीत पीडीत पतीला दिलासा दिला आहे.

सासू-सासऱ्यापासून पतीला वेगळे करणे क्रूरताच… (भाग-२)

या अपिलामध्ये अपीलकर्ता पती व जाब देणारी पत्नी यांचा विवाह सन 2010 साली झाला होता. त्यांना 2011 साली मुलगा झाला. सदर पतीचे वडील म्हणजेच जाब देणारे पत्नीचे सासरे हे या दोघांच्या विवाहापूर्वीच मयत झाले होते. तसेच त्या पतीच्या सहा बहिणींची लग्नेदेखील या दोघांच्या लग्नापूर्वीच झाली होती. त्यामुळे घरी फक्‍त अपीलकर्ता पती व त्याची आजारी आई होती. काही दिवसांत पत्नी पतीला आईपासून वेगळे राहण्याचा हट्ट करून त्रास देऊ लागली. सदर पतीने माझी नोकरी कायम नाही त्यामुळे मला वेगळे भाडोत्री घर घेणे परवडणारे नाही असे सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या पत्नीने आपल्या सासऱ्याचे घर विकून टाकून पतीने आपल्याबरोबर वेगळे राहावे असा हट्ट धरला. कमी शिक्षण असलेली पत्नी आपल्या बहिणीचे ऐकून पतीला त्रास देत होती. तसेच मुलाच्या गळ्याला चाकू लावून त्याला मारून टाकीन व स्वत: मीपण गंगा नदीत उडी टाकून आत्महत्या करीन अशी धमकी देत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)