रॉबर्ट वढेरा ईडी समोर हजर

नवी दिल्ली- कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा आज मनी लॉंडरिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात हजर झाले. हे प्रकरण विदेशात खरेदी केलेल्या मालमत्तांशी संबंधित मनी लॉंडरिंगचे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी 10.30 वाजता वढेरा यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या देखील “ईडी’च्या कार्यालयात आल्या. मात्र त्या कार्यालयाबाहेरच थांबल्या होत्या. वढेरा यांना या प्रकरणी “पीएमएलए’ कायद्यांतर्गत जबाब नोंदवून घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी “ईडी’च्या कार्यालयामध्ये येण्याबाबत समन्स बजावले होते.

आपण 11 वेळी “ईडी’च्या कार्यालयात आलो आणि एकूण 70 तासांसाठी आपली चौकशी करण्यात आली असल्याचे वढेरा यांनी ट्‌विटर आणि फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्‍वास आहे. त्यामुळे सर्व समन्स आणि सर्व सरकारी एजन्सीच्या निकषांचे पालन आपण करनार आहोत, असेही वढेरा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणी वढेरा अनेकवेळेस “ईडी’च्या कार्यालयामध्ये येऊन गेले आहेत. “ईडी’ने नुकतेच वढेरा यांच्या अटकपूर्व जामीनाला आणि विदेश प्रवासालाही विरोध केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)