रावण टोळीचा म्होरक्‍या सागर वाघमोडे गजाआड

अँन्टी गुंडा स्क्‍वॉडची कारवाई : पिस्तूलासह केले अटक
पिंपरी –
अनेक गंभीर गुन्ह्यामुळे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला रावण टोळीचा म्होरक्‍या ससा उर्फ सागर दशरथ वाघमोडे याला शहरातूनच अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अँन्टी गुंडा स्क्‍वॉड पथकाने एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह त्याला अकेली आहे.

ही कारवाई आकुर्डी येथील रेल्वे स्थानक परिसरात केली. ससा उर्फ सागर दशरथ वाघमोडे हा पिंपरी-चिंचवड शहरात सक्रिय असलेल्या रावण टोळीचा सूत्रधार म्हणून कुख्यात आहे. त्याच्या विरोधात पिंपरी, चिंचवड, देहुरोड आणि पुणे शहरात विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, मारामारी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तो मागील वर्षापासून शहरात आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होता. गेल्या वर्षीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला जानेवारी 2019 मध्ये पुन्हा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र हा आदेश झुगारुन तो शहरातच वावरत होता.

ऍन्टी गुंडा स्क्‍वॉडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आपल्या पथकाद्वारे अशा गुन्हेगारांवर नजर ठेऊन आहेत. या दरम्यान त्यांच्या पथकाला सोमवारी माहिती मिळाली की, शहरातून तडीपार केलेला ससा उर्फ सागर हा शहरातील आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातच वावरत आहे. पोलिसांनी तातडी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून ससा उर्फ सागर वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन त्याला अटक केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)