बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
राखीने अपलोड केलेल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मला माझा भारत देश खूप प्रिय आहे. हा फोटो माझा आगामी चित्रपट “धारा 370′ मधील लोकेशनवरचा आहे. तरीदेखील तिचे चाहते तिच्यावर नाराज आहेत. या फोटोनंतर अनेकांनी तिला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देखील दिला आहे.
राखीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यानंतर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, “हाय फ्रेंड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. “धारा 370′ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर आधारित आहे.
राखीने म्हटले आहे की, “मी या चित्रपटात एका पाकिस्तानी तरुणीची भूमिका साकारत आहे. तुम्ही माझे कपडे पाहू शकता, या चित्रपटात लहान मुलांना जिहादी बनवणाऱ्या दहशतवादी संघटनांचा भांडाफोड करणाऱ्या तरुणीची भूमिका मी करत आहे, असे तिने म्हटले आहे.