#IPL2019 : राजस्थानचा हैदराबादवर सात गडी राखून विजय

जयपूर – गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर राजस्थानने हैदराबादचा 7 गडी राखून पराभव करत आगेकूच केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 160 धावांची मजल मारली. यावेळी 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाने धमाकेदार सुरूवात केली.

सलामीवीर अजिंक्‍य रहाणे आणि लिविंगस्टोनयांनी संघाला 9.1 षटकांत 78 धावांची धमाकेदार सलामी दिल्यानंतर लिविंगस्टोन 44 धावा करुन परतला. यानंतर आलेल्या संजु सॅमसनला हाताशी धरुन रहाणेने संघाचा डाव सावरला. मात्र, 39 धावा करुन तो परतल्यावर कर्णधार स्मिथने फटकेबाजी करत 22 धावा केल्या. विजयास 13 धावा कमी असताना तो परतल्यानंतर संजु सॅमसन आणि टर्नर यांनी विजयाची औपचारिकता पुर्ण करत 19.1 षटकांत 3 बाद 161 धावांची मजल मारुन दिली.

यावेळी, हैदराबादच्या संघाचा सलामीवीर केन विल्यम्सन 13 धावा करून परतल्याने हैदराबादला 28 धावांवर पहिला धक्‍का बसला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी डावाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. मात्र, वॉर्नरने सावध फलंदाजी केली.

तर, मनिष पांडेने पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके खेळत धावगती वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे हैदराबादने 10 षटकांत 1 बाद 86 धावांची मजल मारली होती. वॉर्नर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाल्याने हैदराबादच्या धावगतीला खीळ बसली. यावेळी मनिष पांडेने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत संघाला शतकी मजल मारून दिली.

मात्र दुसऱ्या बाजूने कोणीही मोठे फटके खेळत नसल्याने दबावात आलेला मनिष पांडे मोठा फटका मारण्याच्या नादात 61 धावा करून परतला. तो बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावल्याने हैदराबादला 160 धावांची मजल मारता आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)