दरेवाडीत दोन गटांत मारहाण

कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे

नगर  –
किरकोळ वादातून दोन गटात दगड, लाथाबुक्क्‌यांनी तुफान हाणामारी झाली. अंतिम चौकात ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅंम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत तुषार पाराजी कळमकर (रा. हनुमान गल्ली, दरेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून पवन मिसाळ व इतरांनी तुषार यांच्या वडिलांना मारहाण सुरू केली. एकाने हातातील दगड मारून तुषार यांच्या डोक्‍यात दुखापत केली.

इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पवन मिसाळ, किरण मिसाळ, दत्तात्रय भानुदास मिसाळ, पवनची आई, त्याची चुलती, रवी मिसाळ (सर्व रा. दरेवाडी, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी गटाच्या दत्तात्रय भानुदास मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पवन मिसाळ यांच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून तुषार कळमकर व त्याच्या इतर साथीदारांनी दत्तात्रय मिसाळ व इतरांना दगडाने मारहाण केली. तसेच दत्तात्रय मिसाळ यांच्या पत्नीच्या डोळ्यावर मारून जखम केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तुषार कळमकर, अजय बेरड, अमोल राहींज, तुषार याचा मित्र, पाराजी कळमकर, पुष्पा कळमकर, यमुना भोगाडे, जगन्नाथ भोगाडे (सर्व रा. दरेवाडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.