प्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ः शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ब्रिटीश कालीन कायद्यात बदल 
कोल्हापूर – शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ब्रिटीश कालीन कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर जमिनीची भरपाई थेट खात्यामध्ये जमा होणार आहे.

विकासात्मक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भुदरगड तालुक्‍यातील गारगोटी येथील आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्यामध्ये जे-जे अर्धवट प्रकल्प होते.

त्या प्रकल्पांना चालना द्यायचा प्रयत्न पाच वर्षांत करण्यात आला. 20-20 वर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ब्रिटीश कालीन कायद्यात बदल करण्यात आले. प्रत्येक अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना मोबदला देणारे सोपे कायदे करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीना चांगल्या किंमती देण्याचा मोठा निर्णय राज्यात घेण्यात आला. त्याचबरोबर वर्ग एकची जमीन शेतकऱ्यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पांमध्ये अडवलेल्या पाण्याचा शेतीसाठी निश्‍चितपणे उपयोग होणार आहे. नागणवाडी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांना आरटीजीएसद्वारे मोबदला मिळणार आहे. त्या प्रमाणपत्राचे आज वितरण करताना मला आनंद होत आहे. विकासात्मक प्रकल्पांना जमीन देण्याचा समजुदारपणा हवा. शेतकऱ्यांना त्यासाठी चांगला मोबदलाही मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)