जमात-उद-दावाचा म्होरक्‍या हाफिज सईदला अटकपूर्व जामीन मंजूर

इस्लामाबाद : लाहोरमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने जमात-उद-दावाचा म्होरक्‍या हाफिज सईद याला अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. हाफिज सईद यांच्यास अन्य तीन जणांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पाकच्या एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

एका मदरशाच्या जमिनीचा बेकायदा कामांसाठी वापर केल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाने हाफिज सईदसह हाफिज मसूद, आमेर हमजा आणि मलिक जफर यांना ऑगस्टपर्यंत हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. काही दिवस अगोदरच पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाकडून टेरर फंडिंग प्रकरणी हाफिजसह जमातच्या 13 नेत्यांविरोधात 23 एफआयआर दाखल केले होते. शिवाय हाफिज सईद विरोधात ठोस पुरावे देखील असल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जमात आणि जैश-ए-मोहम्मदच्या 12 कार्यकर्त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.