पोलिसांनी वाचवले एका वर्षाच्या मुलीचे प्राण !

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये बांदा ठाण्यांतर्गत पचोखर गावात मंगळवारी सकाळी ६ वाजता एक मुलगी खेळत-खेळत एका शेतातील बोअरवेलमध्ये पडली. मुलीचे आई-वडील त्याच शेतामध्ये काम करत होते. १० फूट खोल बोअरवेलमध्ये सदर मुलगी फसली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटना स्थळी धाव घेतली.

जेसीबी मशीनच्या साहायाने पोलिसांनी २ तासाच्या आत मुलीला वाचवले. एसपी गणेश साहा आणि इतर पोलिसांनी मुलीचे प्राण वाचवले म्हणून आनंद व्यक्त केला. त्यानंतर मुलीला होसीहॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

https://twitter.com/ANINewsUP/status/1118067208846893056

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)