हाऊसिंग इंडस्ट्रीत नवा ट्रेंड (भाग-१)

अलिकडेच रिअल इस्टेट सेक्‍टरने नवीन योजना सुरू केली आहे. त्याला स्टुडंट हाऊसिंग असे नाव दिले आहे. स्टुडंट हाऊसिंगनुसार कुटुंब, शहर सोडून दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलपेक्षा चांगली सुविधा प्रदान केली जात आहे.

अलीकडेच देशात रिअल इस्टेटमध्ये नवीन संकल्पना रुजली आहे, ती म्हणजे स्टुडंट हाऊसिंग. या संकल्पनेची रचना करताना शिक्षणासाठी गाव सोडून महानगरात आलेल्या विद्यार्थ्यांना समोर ठेवले आहे. शिक्षणासाठी हजारो मुले दरवर्षी आपले गाव सोडून शहरात येतात. प्रत्येकालाच चांगले हॉस्टेल किंवा भाड्याची खोली मिळेलच याची खात्री नसते. काही जण कॉटबेसीसवर राहून किंवा शेअरिंगने खोली घेऊन शिक्षणकार्य पूर्ण करत असतात. वीस-पंचवीस वर्षे घराच्या वातावरणात राहिलेल्या मुलांना अचानक शिक्षणासाठी घर सोडावे लागते. अशा स्थितीत काही मुले आजारी देखील पडतात.

कधी कधी जेवणही चांगले नसल्याने आजार बळावल्याची उदाहरणे आपल्या ऐकिवात असतात. त्यामुळे महानगरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना विविध पायाभूत सुविधेपासून वंचित राहवे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी स्टूडंट हाऊसिंगची कल्पना करण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना घराप्रमाणेच सुविधा किंवा पंचतारांकित हॉटेलप्रमाणेच राहणीमान उपलब्ध करून दिले जात आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास रेल्वेत ज्याप्रमाणे प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि स्लिपर कोचची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाते, त्यानुसार स्टुडंट हाऊसिंगमध्ये राहण्याची सुविधा दिली जात आहे. उच्च श्रेणीतून प्रवास केल्यास थकवा जाणवत नाही, त्याचप्रमाणे चांगल्या श्रेणीत निवासाची सोय झाल्यास शिक्षणही सोपे होऊ शकते, असा विचार मांडला गेला आहे.

हाऊसिंग इंडस्ट्रीत नवा ट्रेंड (भाग-२)

देशात दरवर्षी साडेतीन कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनी आपले घर, कुटुंब आणि शहर सोडून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जातात. यातील 30 टक्के विद्यार्थी हॉस्टेल किंवा वस्तिगृहाची सुविधा घेतात. याशिवाय महानगरात असंख्य मुले हे भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेतात. विद्यार्थी आपले घर, पालक, मित्र यांना सोडून शिक्षणासाठी अन्य शहरात स्थलांतरित होतात आणि अशा ठिकाणी राहतात की तेथे पायाभूत सुविधांचा अभाव असतो. अनेक त्रास सहन करत ते शिक्षण पूर्ण करत असतात. यादरम्यान विद्यार्थ्यांना जेवण आणि राहण्यासाठी तडजोड करावी लागते. मनाप्रमाणे राहण्यासारखे किंवा जेवण मिळत नाही. अशा स्थितीतही ते महानगरात टिकून राहतात. काही सोसायटीत तर बॅचलर मुलांना राहण्याचीही परवानगी दिली जात नाही. त्यामुळे चांगल्या सोसायटीत राहण्यापासून विद्यार्थी वंचित राहतात. त्यामुळे राहण्याचे ठिकाण स्वच्छ किंवा हवेशीरच असते असे नाही. ही परिस्थिती पाहून अलिकडेच रिअल इस्टेट सेक्‍टरने नवीन योजना सुरू केली आहे. त्याला स्टुडंट हाऊसिंग असे नाव दिले आहे. स्टुडंट हाऊसिंगनुसार कुटुंब, शहर सोडून दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलपेक्षा चांगली सुविधा प्रदान केली जात आहे. भारत स्टुडंट हाऊसिंग हे एक उदाहरण सांगता येईल. मात्र सुरवातीच्या काळात मुंबई, दिल्ली, पुण्यासह अनेक महानगरात अशा प्रकारचा ट्रेड वाढत चालला आहे. अर्थात परदेशात ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासारख्या देशात स्टुडंट हाऊसिंग संकल्पना अगोदरपासूनच रुजलेली आहे.

– कमलेश गिरी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.