नवी दिल्ली – ‘पीएम मोदी’ हा सिनेमा निवडणूकीच्या काळात १९ मे पूर्वी प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. मुक्त आणि निष्पक्ष लोकसभेच्या निवडणुकीसाठी हा सिनेमा सध्या प्रदर्शित न करण्याच्या बाजूने निवडणूक अधिकाऱ्यांनी आपले मत मांडले आहे.
EC: Election Commission is of the view that the movie 'PM Narendra Modi' should not be released till May 19. Poll Body officials say delaying the release will be in the interest of free and fair Lok Sabha elections. pic.twitter.com/x2566ZFxDE
— ANI (@ANI) April 25, 2019
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे परीक्षण केले होते आणि त्याबाबतचा 20 पानी अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या जीवनपटामुळे एकाच व्यक्तीभोवतालचे वलय निर्माण होते. निवडणूकीतल्या आचार संहितेच्या काळात सार्वजनिकपणे या चित्रपटाचे प्रदर्शन केल्यास त्याचा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षालाच फायदा मिळण्याची शक्यता आहे.
या चित्रपटामध्ये प्रमुख राजकीय पक्ष हा भ्रष्टाचारी असल्याचे दाखवले गेले आहे. त्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिका कोणत्या नेत्यांशी संबंधित आहेत, हे लगेच ओळखता येऊ शकते. हा जीवनपटापेक्षा चरित्रपट आहे, असेही निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.