‘अंग्रेजी मिडीयम’ मध्ये इरफानसोबत झळकणार करीना कपूर खान 

मुंबई – मेंदूतील विकारावारील उपचारानंतर भारतात परतलेल्या इरफान खानने आपल्या ‘अंग्रेजी मिडियम’ च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. ‘हिंदी मिडियम’ या त्याच्या गाजलेल्या सिनेमाचा सिक्‍वेल असलेल्या ‘अंग्रेजी मिडियम’ सिनेमात इरफानसह कोणती अभिनेत्री दिसून येणार याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी या यामागचा खुलासा केला आहे.

‘अंग्रेजी मिडीयम’ या सिनेमात इरफानसह अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार असून, ती पोलिसाची भूमिका साकारणार असल्याचे तरुण यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. कित्येक दिवस आपल्या फॅन्सपासून दूर राहिलेल्या इरफानला पुन्हा आपल्या जून्या रंगात आलेले बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. या सिनेमात इरफानचे नाव मिस्टर चंपकजी आहे. ‘हिंदी मिडियम’ मध्ये आपल्या मुलाला इंग्रजी मिडियमच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपडणारा बाप इरफानने साकारला होता. आता त्याच्या या कथेचाच पुढचा भाग दिसणार की त्यापेक्षा वेगळी कथा पहायला मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.