#LIVE : नोटाबंदी १९४७ सालापासूनचा सगळ्यात मोठा घोटाळा- राज ठाकरे

राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे 
 • पनवेल येथील सभास्थळी राजसाहेबांचं आगमन. लवकरच राजसाहेबांच्या भाषणाला सुरुवात.
 • ही लोकसभा निवडणूक विलक्षण आहे, जो पक्ष निवडणूक लढवत नाहीये त्या पक्षावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे. बरं माझ्या पक्षावर टीका केल्याने मला काही फरक पडणार नाही पण सत्ताधाऱ्यांना नक्की पडणार
 • प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना खोटं बोलायची का वेळ येते?
 • गुजरातमध्ये मोदींच्या प्रचारयात्रेत तुफान गर्दी होत आहे असा दावा भाजपच्या आयटी सेलने केला आहे. पण टीव्ही९ मराठी ने जेंव्हा ह्याचा सत्यतेचा शोध घेतला त्यावेळेस लक्षात आलं की ह्या आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो वापरले. ह्यावर भाजप का बोलत नाही?
 • वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार मोदी देणार होते त्याचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली? ह्या नोटबंदीच्या रांगेत अनेक माणसं गेली, ४.५ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ह्यावर मोदी कधी बोलणार?
 • देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल ह्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचा सारांश, नोटबंदीच्या अगोदर उर्जित पटेल ह्यांच्या सहीने २ हजारच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या, त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास ३ लाख कोटी रुपये बदलून दिले गेले.
 • कपिल सिब्बलांच्या आरोपांवर भाजप उत्तरं का देत नाही
 • मी २०१८ च्या पाडवा मेळाव्यात म्हणालो होतो की नोटबंदीची जेंव्हा चौकशी होईल तेंव्हा १९४७ सालापासूनचा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि हे आता सिद्ध होऊ लागलं आहे.
 • मोदींच्या काळात अनेक उद्योगपती बँकांना बुडवून देशाबाहेर फरार झाले. निरव मोदींवर केसेस होत्या, सीबीआय पण एका प्रकरणात्याची चौकशी करत होते पण तरीही निरव मोदी देश सोडून पळून जाऊच कसा शकला?
 • विजय मल्ल्यानी ९००० कोटी रुपयांचं बँकांच कर्ज थकवलं होतं, पण विजय मल्ल्या हे पैसे भरायला तयार होते पण त्यांना संधी का दिली नाही? आणि १ लाख २० हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून देखील त्याला राफेलची विमान बनवायची संधी कशी दिली? कुठला अनुभव होता अनिल अंबानीना?
 • बँकांचे पैसे बुडले तर सामान्य ग्राहकांना फटका बसू नये, म्हणून रिझर्व बँकेकडे एक रिझर्व्ह फंड असतो, त्या फंडातून पैसे मोदी सरकारला हवे होते पण त्याला उर्जित पटेलांनी नकार दिला आणि राजीनामा देऊन ते निघून गेले.
 • RBI च्या फंडाला हात घालायची जर सरकारवर वेळ येत असेल तर मोदी पुलवामा हल्ल्यानंतर कशाच्या जीवावर युद्ध करायला निघाले होते?बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये किती माणसं मारली गेली ह्याचा तपशील आमच्याकडे नाही असं हवाईदल प्रमुख सांगत असताना, २५० माणसं मारली गेली हा दावा अमित शाह कुठून करत होते
 • निरव मोदी देशातल्या बँकांना बुडवून पळून गेले, त्यावर टीका सुरु झाली, त्यानंतर त्या बातमीपासून मन वळवायला भाजप धार्जिण्या माध्यमांनी श्रीदेवी ह्यांच्या मृत्यूचं किळसवाणं वार्तांकन करून लोकांचं लक्ष निरव मोदींपासून वळवण्यासाठी धडपडत होती
 • बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये कोणीही गेलं नाही असं सुषमा स्वराज म्हणाल्या. मला सांगा जर आम्ही पुरावे मागितले तर आम्ही देशद्रोही तर मग सुषमा स्वराज जे म्हणाल्या त्यावर त्या आता देशद्रोही का देशप्रेमी?
 • पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी एक पुरस्कार घ्यायला कोरियाला गेले.
 • काँग्रेसच्या काळातील योजनांची नावं बदलून नरेंद्र मोदींनी त्याच योजना पुन्हा घोषित केल्या. आणि ह्या योजना यशस्वीपणे राबवण्याऐवजी त्यांच्या जाहिरातींवर ४.५ ते ५ हजार कोटी रुपये खर्च केले
 • पंतप्रधानांनी जे गाव दत्तक घेतलं तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचं पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचं कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचं पाणी वाहतंय, गावात रोगराई पसरली आहे. मोदींनी दत्तक घेतलेलं गाव सुधारू शकलं नाही ते देश काय सुधारणार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.