पिंपरी – भल्या पहाटे चोरट्यांनी चिखली येथील एका स्वीट मार्टचे शटर उचकटून 1 लाख 15 हजार रुपये चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (दि.19) पहाटे पावनेचार सुमारास चिखली येथील जगदंबा स्वीटमार्ट दुकानात घडली. याप्रकरणी, जगदीश हंसारामजी चौधरी (वय-47, रा. लक्ष्मी सोसायटी,चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, पल्सर दुचाकीवरुन आलेल्या तिन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चौधरी यांच्या चिखली, सुदर्शननगर येथील जगदंबा स्वीटमार्ट या दुकानाचे पहाटे पावनेचार वाजताच्या सुमारास पल्सर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी शटर उचकटले. चोरट्यांनी दुकानातील कॅश काऊंटरमधील सेविंहग ड्रॉवरचे लॉक तोडून त्यामधील 1 लाख 15 हजार रुपयाची रक्कम पळवून नेली. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बागुल हे तपास करीत आहेत.