पिंपरी – खडी वाळू मिक्सर प्लान्टमध्ये काम करत असताना डोक्यात लोखंडी टॉप पडल्याने एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी कामगारांना कुठल्याही प्रकारची सुविधा न पुरवल्यामुळे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन पोमा पवार (वय 45, रा. पुनावळे) असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार हनुमंत पुजारी (वय 40, रा. जाधववाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन पवार हे वाकड येथील हॉटेल रॉयल शेजारील खडी वाळू मिक्सर प्लॅन्टमध्ये काम करत होता. ते नेहमीप्रमाणे 3 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास काम करत असताना अचानक त्याच्या डोक्यात लोखंडी टॉप पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.